Type Here to Get Search Results !

चाळी, झोपडपट्टय़ांमध्येही करोना रुग्ण ; महापालिकेपुढे प्रतिबंधाचे आव्हान

मुंबई : मुंबईत गेल्याकाही दिवसांपासून करोनारुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून झोपडपट्टया व चाळींमध्ये देखील रुग्ण आढळू लागले आहेत. मुंबईतील ११ चाळी व झोपडपट्टया सध्या प्रतिबंधित आहेत. 

गेल्यावर्षी ऑगस्ट २०२० पासून मुंबईतील करोनाची साथ आटोक्यात येऊ लागली व त्यानंतर मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या शून्यावर आली. दुसऱ्या लाटेत जास्तीत जास्त रुग्ण हे इमारती, उच्चभ्रू गृहनिर्माण संस्था यामधील होते. त्यामुळे झोपडपट्टया प्रतिबंधित होण्याचे प्रमाण कमी होत शून्यावर आले होते. मात्र गेल्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून झोपडपट्टय़ांमध्येही रुग्ण आढळू लागले असून मुंबईतील ११ चाळी व झोपडपट्टय़ा प्रतिबंधित असून त्यात सुमारे सव्वा लाख लोकसंख्या आहे. करोना रुग्णवाढीचा वेग सध्या जास्त असून त्यातच झोपडपट्टय़ांमध्ये संसर्ग पोहोचल्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे. झोपडपट्टय़ांमध्ये रुग्ण वाढल्यास या रुग्णांच्या व त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणावर भर दिला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुलांच्या लसीकरणासाठी..

मुंबईत आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी  एकूण नऊ लसीकरण केंद्रे निश्चत करण्यात आली आहेत.  प्रतिसाद कसा असेल ते पाहून या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रातून या मोहीमेला सोमवारी सुरुवात होणार आहे.

मुंबईत ८०६३ नवे बाधित

लक्षणेविरहित :  ७१७६

रुग्णालयात दाखल :  ५०३

ठाणे जिल्ह्य़ात १,७९६ नवे रुग्ण

ठाणे शहर ५८०, नवी मुंबई ५२३

मीरा-भाईंदर २९५, कल्याण-डोंबिवली २१४, उल्हासनगर ६१, ठाणे ग्रामीण ५८,  बदलापूर ३४, अंबरनाथ २४, आणि भिवंडीमध्ये ७.

The post चाळी, झोपडपट्टय़ांमध्येही करोना रुग्ण ; महापालिकेपुढे प्रतिबंधाचे आव्हान appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sRhZ0A
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.