मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात नामवंत मराठी साहित्यिकांचा समावेश करण्यात आला आहे.
पुढील २५ वर्षांचे मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यात सत्तांतर झाले की, शासकीय समित्या, महामंडळेही बदलतात.
राज्यात २०१० मध्ये कायमस्वरूपी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वेळोवळी समितीची पुनर्रचना करण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही आता लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पुनर्रचना केली आहे.
या समितीत डॉ. श्रीपाद जोशी, पंडित विद्यासागर, सुहास पळशीकर, केशव देशमुख, हरिश्चंद्र बोरकर, रमेश वरखेडे, डॉ. वंदना महाजन, प्रकाश परब, किशोर कदम, प्रा. मििलद जोशी, वैजनात महाजन, डॉ. अनुपमा उजगरे, पृथ्वीराज तौर, पी. विठ्ठल, सुरेश वांदिले, अनुराधा मोहनी, जयश्री देसाई, प्रणव सुखदेव, प्रकाश होळकर, विवेक घोटाळे, सयाजी िशदे, डॉ. गणेश चंदनशिवे, जयंत येलूलकर, शमसुद्दीन तांबोळी व राजीव यशवंते या साहित्यिकांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
शासनाच्या वतीने मराठी भाषा, पर्यटन व सांस्कृतिक, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण या विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव वा सचिव हे सदस्य आहेत, भाषा संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.
महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षांतील मराठी भाषेचे धोरण ठरिवणे, भाषा अभिवृद्धीसाठी नवनवे उपाय व कायक्र्रम सूचविणे, या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे, तसेच भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नवीन प्रचिलत शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे, परिभाषा कोशाचे पुनर्मुद्रण, मराठी परिभाषिक सुज्ञांच्या समस्या सोडिवणे, यांसारखी कामे पार पाडण्यासाठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाने गुरुवारी जारी
केलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.
The post भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना ; लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्ष; नामवंत साहित्यिकांचा समावेश appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3z9cTOw
via IFTTT