महापालिकेचे नवे संकल्प.. समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण, सीबीएसई शाळा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यंदा होणार असल्याने हे वर्ष अनेक नव्या प्रकल्पांच्या मुहूर्तमेढीचे ठरणार आहे. समुद्रापासून गोडे पाणी मिळवण्याचा प्रकल्प या वर्षांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा, तर अन्य मोठय़ा प्रकल्पांमध्ये सागरी किनारा प्रकल्प प्रगतीपथावर असून गोरेगाव मुलंड जोडरस्ता, देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती, मुंबई मलनिस्सारण प्रकल्प असे मोठय़ा कालावधीचे प्रकल्प विविध टप्प्यांवर आहेत.
समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या नि:क्षारीकरण प्रकल्पाला येत्या नवीन वर्षांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. दररोज ४०० दशलक्ष लीटर म्हणजेच ४० कोटी लीटर पाणी मिळवण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. त्यासाठी मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत उपलब्ध असलेल्या १२ हेक्टर जागेवर ही यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. पालिकेचे दोन धरण प्रकल्प रखडलेले असताना भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पालिकेने समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा महत्त्वाकांक्षी असा नि:क्षारीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. तब्बल साडेतीन हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. मुंबईला सात धरणांतून ३८०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र, एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. त्यातच येत्या काळात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणीही वाढणार आहे. त्यामुळे पालिकेने गारगाई, पिंजाळ हे धरण प्रकल्पही हाती घेतले आहेत.
आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या दोन शाळा
पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे नवीन वर्षांत जून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या दोन शाळा सुरू होणार आहेत. आय.बी. बोर्डाची एक शाळा व केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय. जी. सी. एस. ई. बोर्डची एक शाळा सुरू होणार आहे. या दोन्ही शाळा कुठे सुरू करायच्या याकरिता शिक्षण विभागाची चाचपणी आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळेत शिकायला येणाऱ्या
विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षांत आणखी दोन बोर्डाचा पर्याय उपलब्ध राहणार आहेत. तसेच गेल्या शैक्षणिक वर्षांत सुरू करण्यात आलेल्या सीबीएससीच्या ११ शाळांमधील व आयसीएसईच्या एका शाळेतील पहिलीच तुकडी यावर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार आहे.
प्राण्यासाठी दहनभट्टी
मुंबईमध्ये आतापर्यंत मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सोय नसल्यामुळे त्यांना खड्डय़ातच पुरले जाते. मात्र, मुंबईतील जागेची कमतरता विचारात घेऊन दहनभट्टय़ा तयार करणे ही काळाची गरज आहे. तसेच खड्डय़ात प्राणी पुरल्यामुळे रोगजंतूंचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मृत प्राण्यांसाठी पालिकेने महालक्ष्मी, मालाड व देवनार अशा तीन ठिकाणी दहन भट्टी सुरू करण्याचे ठरवले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याबाबतचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मालाड व देवनार येथील भट्टीचे काम प्रगतीपथावर आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही भट्टी उभारली जाणार असून ती पर्यावरण पूरक आहे.
आरोग्य व्यवस्थेतील पायाभूत सुविधांच्या विस्तारावर नवीन वर्षांत भर
१. हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत कार्यरत
२. नायर रुग्णालयातील कर्करोग विभागाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.
३. उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम कार्यरत होणार आहे.
४. चांदिवली संर्घषनगर भागात २५० खाटांचे नवीन उपनगरीय रुग्णालय
५. चेंबूर, देवनार, शिवाजीनगर या परिसरातील झोपडपट्टीबहुल भागासाठी ५० खाटांचे नवीन प्रसूतिगृह
६. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हाजीअली आणि अक्वर्थ रुग्णालयातील वसतिगृहाची इमारत खुली
७. मुलुंड एम.टी. अग्रवाल आणि सिद्धार्थ नगर येथील उपनगरीय रुग्णालयांची दुरुस्ती पूर्ण केली जाऊन वर्षभरात कार्यरत केली जाणार आहेत.
८. बोरिवलीच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
९. नायर दंत रुग्णालयातील नवीन इमारतीचे लोकार्पण
जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी अथवा मरिन ड्राइव्ह असो एरव्ही नववर्षांच्या पूर्वसंध्येला गजबजून जाणारी ही स्थळे वाढत्या करोना संसर्गामुळे लावलेले निर्बंध व पोलिसांच्या गस्तीमुळे बऱ्याच प्रमाणात सुनसान होती. जुहू चौपाटी बाहेर असणाऱ्या खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान काही प्रमाणात गर्दी दिसून आली, मात्र, नियमानुसार पोलिसांनी त्यांना वेळेचे भान दिल्यावर ती गर्दीही ओसरली. एकंदरच, मागच्या वर्षीप्रमाणे याही सरत्या वर्षांला मुंबईकरांना निर्बंधातच निरोप द्यावा लागत आहे.
The post नवे वर्ष..नवे प्रकल्प.. appeared first on Loksatta.
January 01, 2022 at 12:02AM

via IFTTT