दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर विजयी
मुंबई : दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजय मिळविलात. त्यांनी भाजपच्या महेश गावित यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले. यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पहिला विजय मिळाला आहे. अन्याय आणि हुकू मशाहीविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त के ली आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर डेलकर कु टुंबानेही मोहन डेलकर यांच्या मृत्यूला भाजपच्या नेत्यांवर आरोप के ले होते. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर डेलकर कुटुंबीयांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दादरा नगर हवेलीत प्रचारसभा घेतली होती. कलाबेन यांना १ लाख १८ हजार ३५, तर भाजपचे गावित यांना ६६ हजार ७६६ मते मिळाली. गुजरातच्या वेशीवरील लोकसभा मतदारसंघातील या विजयामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे.
दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाहीविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर व्यक्त केली.
The post महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिलाच विजय! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EHuCOK
via IFTTT