मुंबई: फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पालिकेची निवडणूक अपेक्षित असून या निवडणुकीसाठी पालिकेने प्रभागांच्या सीमा निश्चितीचे काम सुरू केले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पालिकेने २२७ प्रभागांच्या सीमांचा कच्चा आराखडा तयार करून तो नुकताच आयोगाला सादर केला. शिवसेनेच्या दबावाखाली हा आराखडा तयार केला असून त्यात पक्षाला पूरक असे बदल शिवसेनेने केले असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
या निवडणुकीच्या प्रभाग रचनेला खूप महत्त्व असते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने आपल्याला फायदा होईल अशा पद्धतीने प्रभागांची पुनर्रचना केल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेसने केला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या तोंडावर प्रभागांची पुनर्रचना करण्याची मागणी शिवसेना व काँग्रेसने केली आहे. प्रभाग रचना बदलण्यासाठी नुकतीच झालेली जनगणना ग्राह्य़ धरली जाते. मात्र करोना व टाळेबंदीमुळे २०२१ ची जनगणना झालेली नाही. त्यामुळे यावेळच्या प्रभाग रचनेलाही २०११ च्या जनगणनेचीच आकडेवारी ग्राह्य़ धरली जाणार आहे. या वेळच्या प्रभाग सीमा या भौगोलिक बदलांवर आधारित असणार आहेत. गेल्या पाच वर्षांत काही महत्त्वपूर्ण भौगोलिक बदल झाले का याचा आढावा घेऊन हा कच्चा आराखडा आयोगाच्या आदेशानंतरच तयार केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
दरम्यान, सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ राजकीय हेतूने शिवसेनेने या प्रभाग रचनेत मनमानी बदल केले असल्याचा आरोप भाजपचे पालिकेतील प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. यात लोकसंख्येचे मोठे भाग राजकीय हेतूने एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरात मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात आले असून ते तपासून बघावे, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.
आक्षेप मांडण्याची संधी
गेल्या पाच वर्षांत एखाद्या प्रभागातील लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर कमी जास्त झाली का हे तपासण्यात आले आहे. त्यात एखाद्या प्रभागात कोणती इमारत पडली किं वा इमारत रिकामी केली का, त्यामुळे नागरिक स्थलांतरित झाले का, एखाद्या मोठा प्रकल्प प्रभागात आला का त्यामुळे मोठय़ा संख्येने नागरिक स्थलांतरित झाले का याचा आढावा घेऊन हा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा आयोग तपासून पाहील व त्यात काही बदल असल्यास सुचवले जातील. अन्यथा हा आराखडा हरकती व सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध केला जाईल. त्यावेळी कोणाचे काही आक्षेप असल्यास ते त्यांना मांडता येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
समाजमाध्यमावर आरोप-प्रत्यारोप
प्रभागांच्या सीमा रचनेवरून शिवसेना व भाजपमध्ये सध्या समाजमाध्यमांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच ट्विटरयुद्धही पेटले आहे. ‘शिवसेना चीट्स मुंबईकर’ असा हॅशटॅग भाजप समर्थकांनी चालवला आहे, तर ‘बॉयकॉट बीजेपी’ असा हॅशटॅग शिवसैनिकांनी चालवला आहे.
The post प्रभाग फेररचनेचा आराखडा सादर ; शिवसेनेने सोयीचे बदल केल्याचा भाजपचा आरोप appeared first on Loksatta.
November 01, 2021 at 03:20AM

via IFTTT