उत्पन्न शून्य आणि खर्च वारेमाप; २२ ऑक्टोबरनंतरही बंदच राहण्याची शक्यता
नीलेश अडसूळ, लोकसत्ता
मुंबई : मल्टीप्लेक्स व ओटीटीमुळे डबघाईला आलेल्या एकपडदा चित्रपटगृहांचे करोनाकाळात दिवाळे निघाले आहे. राज्य सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी आर्थिक अडचणींमुळे एकपडदा चित्रपटगृहे मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय काही मालकांनी घेतला आहे. केवळ शहरांमध्येच नाही तर राज्यभरात एकपडदा चित्रपटगृहांची हीच अवस्था असेल, असा अंदाज सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने वर्तवला आहे.
एकपडदा चित्रपटगृहांना आधीच घरघर लागली होती. मल्टीप्लेक्स आले त्या दिवसापासून या चित्रपट गृहांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला. त्यात करोनाचा घाव अधिक वर्मी लागला. गेल्या दोन वर्षांत विविध कर भरून मालकांचे आर्थिक कंबरडे असे मोडले आहे की काहींकडे डागडुजीला पैसे नाही तर काहींनी वीजदेयक भरले नसल्याने त्यांचे मीटर कापले आहेत. त्यामुळे पुन्हा चित्रपटगृह सुरू करायचे म्हणजे लाखोंची गुंतवणूक या मालकांना करावी लागणार आहे. शिवाय नफा मिळेलच का याची खात्री नसल्याने चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णयापर्यंत मालकवर्ग पोहोचला आहे.
‘करोनाच्या आधीपासूनच आमची परवड सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आम्ही सरकारला वारंवार मदतीची विनंती करूनही आम्हाला दाद मिळाली नाही. करोनामध्ये व्यवसाय बंद असूनही मालमत्ता कर आणि चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी लागणारे लाखोंचे कर भरावेच लागत होते. त्यामुळे या काळात होते नव्हते सगळे गेले. शिवाय आता पुन्हा सुरू करायचे म्हटले तर ध्वनी, प्रकाश, पाण्याची यंत्रणा, डागडुजी यासाठी अमाप खर्च येणार आहे. तो पेलणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एक पडदा चित्रपट गृहे बंदच राहतील,’अशी व्यथा सातरस्ता येथील शिरीन टॉकीजचे मालक आणि सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष विराफ वाच्छा यांनी मांडली.
पडझड मोठी
‘दोन वर्षे चित्रपट गृहे बंद असल्याने अंतर्गत यंत्रणा पूर्णत: बंद पडली आहे. पावसामुळे झालेल्या गळतीचेही प्रमाण मोठे आहे. या चित्रपटगृहांची डागडुजी केल्याशिवाय ती सुरू करता येणार नाहीत. याचा दुरुस्तीचा खर्च लाखोंच्या घरात आहे. एकपडदा चित्रपटगृहांना मिळणारा प्रतिसाद अत्यल्प असल्याने ही दुरुस्ती करूनही तोटाच स्वीकारावा लागणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे पगार, थकीत कर हा बडगा वेगळाच आहे, असे चित्रपटगृह मालकांचे म्हणणे आहे.
सरकारने या चित्रपट गृहांना सवलती द्यायला हव्या. ज्यामध्ये दोन वर्षांतील मालमत्ता कर, वीज देयक, चित्रपट परवाना माफ करायला हवा. २०१९-२० मध्ये चित्रपट परवान्याचे पैसे आम्ही भरले पण मार्च मध्येच टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे तो परवाना आता वाढवून द्यायला हवा. तसेच सेवा कर वाढवून दिल्यास आम्हाला दिलासा मिळेल. सध्या पन्नास टक्केच उपस्थितीला परवानगी असल्याने आगामी काळात पन्नास टक्केच कर लागू करावा.
– नितीन दातार, अध्यक्ष सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया
The post एकपडदा चित्रपटगृहांचे दिवाळे appeared first on Loksatta.
October 02, 2021 at 02:54AM

via IFTTT