मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी आर्थर रोड तुरुंगात झालेल्या मैत्रीबाबत वृत्तवाहिन्यांना मुलाखती देणे आणि बढाई मारणे एका आरोपीला महाग पडले. जुहू पोलीस याच आरोपीचा घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये शोध घेत होते. मुलाखत पाहिल्यानंतर पोलिसांनी तुरुंगासमोरच त्याला अटक केली.
धारावीचा रहिवासी श्रावण नाडर याला माटुंगा पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडी झाल्यावर तो आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात होता. तो आणि आर्यन खान साधारण एकाच वेळी तुरुंगात होतो, असा दावा त्याने केला आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी नाडरला जामीन मिळाला.मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला गुरुवारी जामीन मंजूर केला तेव्हा वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर बातमी पाहून आर्यन बाहेर येईल, या अपेक्षेने नाडर गुरुवारी रात्री आर्थर रोड तुरुंग परिसरात गेला होता. पण आर्यन त्या रात्री तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. नाडरने उपस्थित वाहिन्यांच्या प्रतिनिधींना तो तुरुंगात आर्यनसोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रतिनिधी नाडरची मुलाखत घेऊ लागले.
The post आर्यनचा मित्र असल्याच्या बढाया मारणारा अटकेत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3BsLmXW
via IFTTT