नवी दिल्ली : इंधन दरात सलग चौथ्या दिवशी रविवारी ३५ पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबईत पेट्रोल दराने ११५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईत पेट्रोल दर ११५.१५ रुपये असून, डिझेलदर १०६.२३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी १०९.३४ रुपये, तर डिझेलसाठी ९८.०७ रुपये मोजावे लागत आहेत. देशातील जवळपास सर्वच मोठय़ा शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडासह अनेक भागांत पेट्रोलने सर्वाधिक म्हणजे १२० रुपयांचा टप्पा ओलांडला.
The post मुंबईत पेट्रोल ११५ रुपयांवर appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2Y2WrkF
via IFTTT