महापालिकेची मोर्चेबांधणी, मूर्तिकारांशी लवकरच चर्चा
नीलेश अडसूळ
मुंबई : येत्या काही दिवसांतच मुंबईमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसवरील (पीओपी) बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू आहे. गतवर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आगामी गणेशोत्सवात पूर्णत: पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या जातील यासाठी पालिकेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मूर्ती व्यवसायातील पीओपीवर बंदी आणून दहा वर्षे झाली तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. उत्सवादरम्यान होणारी जलस्रोतांची हानी आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची समस्या लक्षात घेत गेल्यावर्षी १२ मे २०२० रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्सवासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. ज्यामध्ये पीओपीच्या मूर्ती घडवू नयेत, अशी स्पष्टता दिलेली आहे.
गेल्या वर्षी उत्सवाच्या तोंडावर ही नियमावली जाहीर केल्याने मूíतकारांनी या निर्णयाला विरोध दर्शवत पीओपीच्या मूर्ती घडवल्या. यंदाही या नियमांच्या अंमलबजावणीसाठी नागपूर खंडपीठाने २५ ऑगस्ट रोजी आदेश दिले. परंतु तोवर उत्सवाची तयारी सुरू झाली असल्याने याही वर्षी या नियमांना बगल देण्यात आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीबाबत थेट न्यायालयानेही भूमिका घेतल्याने लवकरात लवकर हे नियम अमलात आणण्याकडे पालिकेचे लक्ष आहे.
त्यासंदर्भात १ ऑक्टोबरला पालिकेने बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबईतील मूíतकार संघटनांचे प्रतिनिधी, उंच मूर्ती घडवणारे मूíतकार आणि उत्सवाशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केली जाणार आहे. आगामी वर्षांत म्हणजे २०२२ च्या गणेशोत्सव
आणि नवरात्रोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्याच्या दृष्टीने
मूíतकारांचे म्हणणे समजून घेतले जाईल.
प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपणच पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या पीओपीचा मूर्तीसाठी केला जाणारा वापर तातडीने बंद व्हायला हवा. नागपूर आणि अमरावती जिल्ह्य़ात याची अंमलबजावणी झालेली आहे. त्यानुसार आगामी उत्सवात मुंबईतूनही पीओपी हद्दपार व्हायला हवा. म्हणूनच एक वर्ष आधीपासून आपण तयारीला लागलो आहोत. यासंदर्भात मूíतकारांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित तेली आहे.
– हर्षद काळे, उपायुक्त परिमंडळ २ आणि गणेशोत्सव समन्वयक
The post ‘पीओपी’ बंदीची अमलबजावणी appeared first on Loksatta.
September 30, 2021 at 12:39AM

via IFTTT