https://ift.tt/eA8V8J मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. कोरोनाचा धोका या पूर्वीपेक्षा जास्त वाढल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महत्त्वाच्या सेवांवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, काही ठिकाणी पेशंटसना बेड मिळणे देखील कठीण झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लसीकरणाच्या कामाला वेग देण्याचाही निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. २५ मार्च रोजी मुंबईतही दिवसभरात ५ हजाराच्या पुढे नवीन रूग्णसंख्या नोंदवली गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे, जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर अतिशय कडक अंमलबजावणीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात पुन्हा कोव्हिड हॉस्पिटल्स तसेच इतर हॉस्पिटल्समध्ये काही बेड शिल्लक आहेत, परिस्थिती विदारक होवू नये आणि हाताबाहेर जावू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3u07lBU
via IFTTT
मोठा निर्णय : रविवारपासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी!
March 26, 2021
0